खराब हवामानामुळे १५ भारतीय एव्हरेस्टवर अडकले

0

नवी दिल्ली :- नेपालमधील एव्हरेस्टवर खराब हवामानामुळे १५ भारतीय  अडकलेले आहे. याबाबत एका समूहाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करून मदत मागितली आहे. हे भारतीय गेल्या तीन दिवसांपासून खराब हवामानामुळे एव्हरेस्टवर अडकले आहेत. खराब हवामानामुळे येथील सर्व विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे या लोकांना बाहेर येण्याचा मार्गच उरलेला नाही. सुषमा स्वराज यांनी ट्विट पाहिल्यानंतर नेपाळमधील भारताचे राजदूत मनजीवसिंग पुरी यांना याप्रकरणी लक्ष घालून मदत कार्य करण्याच्या सूचना केल्या आहे.

सर्वांन सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न
शनिवारी सुषमा स्वराज आणि विदेश मंत्रालयाला अमित ठाढानी नावाच्या एका डॉक्टरने ट्विट करत, आम्ही लुकला याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून अडकलो आहोत. तुम्ही आमची मदत करू शकता का? आम्ही सुमारे १५ भारतीय येथून सुरक्षित बाहेर पडण्याची वाट पाहत आहोत. स्थानिक दुतावासाबरोबर आम्ही संपर्क केला पण अजून काहीही होऊ शकलेले नाही, असे ठाढानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

आम्ही काठमांडूतून लुकला जाण्यासाठी २०० डॉलर प्रती व्यक्ती म्हणजेच १३ हजार रुपयाहून जास्त पैसे दिले होते, अशी माहितीही ठाढानी यांनी ट्विट करून सांगितले. सुषमा स्वराज यांच्या सूचनेनंतर सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले आहे. दुतावासांनी सांगितले की, आम्ही त्यांना हेलीकॉप्टर मदतीने काढण्याचा प्रयत्न करत आहोत.

लुकला हे 2,860 मीटरच्या उंचीवर स्थित आहे. हे माउंट एव्हरेस्टचा गेटवे मानला जातो. हे विमानतळ जगातील सर्वात धोकादायक मानले जाते.