भारतात आतापर्यंत इतक्या लोकांनी घेतली कोरोना लस

0

नवी दिल्ली: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सगळ्यांच्या नजरा लसीकडे लागले होते. जगभरात लस निर्माण झाली असून भारतातही स्वदेशी बनावटीच्या लसींची निर्मितीनंतर वापराला परवानगी देण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून डॉक्टर्स, पोलीस, नर्सेसआदींसह फ्रंट लाईन वर्कस लोकांना पहिल्या टप्प्यात कोरोना लस दिली जात आहे. दरम्यान आतापर्यंत भारतात १५ लाख ८२ हजार २०१ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. साधारण एप्रिलमहिन्यात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ६ लाख ५४ हजार ५३३ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे त्यातील १ कोटी ३ लाख १६ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहे. दुर्दैवाने १ लाख ५३ हजार ३३९ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १ लाख ८४ हजार ४०८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. भारताती रिकव्हरी रेट सुरुवातीपासूनच चांगला आहे. इतर देशांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाणात भारतात अधिक आहे.