नवापूर (हेमंत पाटील): कोरानामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने गुजरात राज्यातील अनेक कारखाने बंद पडले आहेत त्यामुळे खानदेशातील अनेक मजूर हे गुजरातमध्ये अडकून पडले आहेत. कोणतेही वाहन मिळत नसल्याने अनेक मजूर पायपीट करत महाराष्ट्रात आपल्या गावी परतू लागले आहेत. रेल्वेसेवा बंद पडले आहे. बस सेवाही नाही, वाटेत खाजगी वाहन मिळेल या आशेने त्यांनी पायी प्रवास सुरू केला असून ते महाराष्ट्रातील नवापूर भागातून आपल्या गावी पायी जात असताना विसरवाडी येथील लोकांनी गाडीची व्यवस्था करुन त्यांना सुखरुप आपल्या गावी रवान केल. तत्पुर्वी सर्वाना जेवण देऊन विश्रांती देखील करण्याची व्यवस्था केली. सदर मजूर हे शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून आले होते. गुजरात मधील कामाला केलेले महाराष्ट्रातील मजूर हे टप्प्याटप्प्याने आपल्या गावाकडे रवाना होत आहेत दीडशेहून अधिक किलोमीटर पायी प्रवास करत रवाना होत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यांची तपासणीही करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. गुजरात राज्यात कामासाठी स्थलांतर झालेले नवापूर तालुक्यातील व जिल्ह्यातील मजुरांना घेण्यासाठी नवापूर परिसरातून अनेक लोक खाजगी गाड्या घेऊन त्यांना घेण्यासाठी जात असल्याचेही चित्र दिसून येत आहे.