जळगाव। भारतातील टुव्हीलर उत्पादकांपैकी एलएमएलची टू व्हीलर मध्ये एनव्ही, सिलेक्ट आणि फ्रिडम यांच्या स्कुअर आणि मोटारसायकलीनंतर आत थ्री-व्हिलर एलएमएल बडी बाजारात दाखल करण्यात आली आहे. या गाडीला 150 सीसी इंजीन असून संपुर्ण पेट्रोलवर चालणारी लिटरला 35 किमीचा अव्हरेज आहे.
एलएमएल बडी ही लहान व मध्यम प्रकारची मालवाहू गाडी असून याचा उपयोग अनेक ठिकाणी व विविध प्रकारे वापर करता येतो. ही गाडी मध्यमवर्गीय नागरीकांना परवडणारी असून शोरूम किंमत 1 लाख 22 हजार रूपयांना उपलब्ध आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान व मध्यम मालवाहतूक उद्योगात तरूणांना चांगली असल्याने रोजगारासाठी उपयुक्त आहे. तसेच डाऊन पेमेंट फक्त 15 हजार रूपये भरून युनियन बँकेतर्फे 9.6 टक्के व्याजाने उपलब्ध आहे. शहरातील खुशाल इंटरप्रायझेस, कालिंका माता मंदीर येथे उपलब्ध असल्याची माहिती खुशाल इंटप्राईझेसचे संचालक विद्याधर नेमाने यांनी पत्रकार परीषदेत दिली.