जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील 16 अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीतासह पीडीतेचा कसून शोध
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात एका भागात राहणारी 16 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. गुरुवार, 28 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कानळदा येथील राहणारा किसन पिंटू बारेला याने अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी शुक्रवार, 29 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तरुणाविरोधात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी किसन पिंटू बारेला याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.