16 काडतूसे जप्त

0

पुणे । गंभीर गुन्ह्यातील दोन सराईत गुंडासह पिस्तूल खरेदी करणार्‍या एका ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तूल तसेच सोळा काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

नितीन सुधाकर अवचिते (वय 30, रा. मावळ), मयुर रामदास सुतार (वय 29, रा. वडगाव) व सागर बबन गोळे (वय 24, रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. अवचिते व सुतार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गुन्हे शाखा दरोडा प्रतिबंधक पथकातील कर्मचारी परवेज जमादार यांना खूनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेले दोघे पिस्तूल घेऊन संगमवाडी रोडवरील टॅ्रव्हल्स पार्किंगजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी गोळे याला 3 गावठी पिस्तूल विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्याकडून 3 पिस्तूल व 3 जिवंत काडतूसे मिळाले.