धानोर्यात अत्याचारानंतर माथेफिरूने फेकले होते विहिरीत
धानोरा- सात वर्षीय बालिकेसह तिच्या सहा वर्षीय भावावर अत्याचार करून त्यांची विहिरीत फेकून हत्या केल्याची कबुली एका माथेफिरूने अडावद पोलिसांना गुरूवारी सायंकाळी दिली होती. रात्रभर परीसरातील विहिरींचा शोध घेवूनही बालकांचा मृतदेह हाती लागला नव्हता मात्र शुक्रवार सकाळी 11 वाजेच्या सुमारास धानोरा शहरातील बाजीराव वामन महाजन यांच्या विहिरीत दोघा चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यानंतर उपस्थितांनाही गहिवरून आले.
बालिकेवर अत्याचार करून विहिरीत फेकले
गुरुवारी सायंकाळी संशयीत आरोपी खालिद शेख इस्माईल याने सात वर्षीय बालिकेसह सहा वर्षीय तिच्या भावाला बोरे खाण्याच्या बहाण्याने शेतात नेल्यानंतर बालिकेवर अत्याचार केला होता तर ही घटना घरच्यांना सांगण्याची पीडीतेने धमकी दिल्यानंतर आरोपी तिच्यासह भावाला विहिरीत फेकले होते तर स्वतः आरोपीनेच घटनेची कबुली सुरुवातीला पोलिस पाटील दिनेश पाटील यांना दिल्यानंतर पाटील यांना पोलिसांना कळवले होते. संशयीत वारंवार याच्या ना त्याच्या विहिरीत बालकांना फेकल्याचे सांगत असल्याने पोलिसांचा ताण वाढला होता अखेर पोलिसांनी त्यास खाक्या दाखवून बोलते केल्यानंतर गुरूवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पट्टीच्या पोहणार्यांनी परीसरातील 10 विहिरी शोधून काढल्या मात्र बालकांचे मृतदेह हाती लागले नाहीत. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू केल्यानंतर बाजीराव वामन महाजन यांच्या विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर पोहणार्यांनी विहिरीत खाट ठाकून मृतदेह बाहेर काढले.
पोलिस अधिकार्यांची भेट
जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी धानोरा येथे भेट देवून माहिती जाणून घेतले तर अडावदचे सहाय्यक निरीक्षक धानोरा येथील शेतात मृतदेह बाहेर काढताना थांबून होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी झाली होती. दरम्यान, संशयीत आरोपी खालिद हा गेल्या दोन वर्षापासून तणावात असल्याची व त्याच्या स्वभावामुळे त्याच्या दोन्ही पत्नी त्याला सोडून गेल्याचे सांगण्यात आले.