16 फरार आरोपींना केले जेरबंद

0

धुळे । जिल्ह्यासह शहरातून अनेक वर्षांपासून फरार असलेल्या 380 आरोपींपैकी 16 आरोपींना अप्पर अधीक्षक विवेक पानसरे व उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या विशेष पथकांनी काही तासातच जेरबंद केले आहे. दरोडा, रस्तालूट, दंगल यासह अन्य गुन्ह्यात फरार धुळे शहर पो.स्टे.-42, आझाद नगर पो.स्टे.-55, देवपूर पो.स्टे.-17, धुळे तालुका पो.स्टे.-35, शिरपूर पो.स्टे.- 157, शिंदखेडा पो.स्टे.-10 यासह अन्य पोलीस ठाण्यातूनही इतके आरोपी फरार आहेत. या फरार असलेल्या आरोपींचा हे पथकं रात्रंदिवस शोध घेत आहेत. यामुळे बहुतांश आरोपी जेरबंद होण्याची दाट शक्यता आहे.

दोन पथक
यासंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये कामाचा ताण अधिक असल्याने त्या-त्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेता फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे आयजी विनय चौबे यांच्या आदेशानुसार एसपी एम.रामकुमार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे व उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या नेतृत्वात दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकांमध्ये प्रत्येकी आठ आणि सात पोलिसांचा समावेश आहे. या पथकांनी जिल्ह्यासह शहरातून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. पानसरे यांचे पथक हे जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणार आहेत तर जाधव यांचे पथक हे धुळे उपविभागातील फरार आरोपींचा शोध घेणार आहेत.

अन्य आरोपींचा शोध
विशेष पथकातील पोलिसांना आदेश मिळताच अवघ्या काही तासात दोन्ही विशेष पथकांनी अनेक वर्षांपासून फरार असलेल्या सुमारे 10 ते 12 आरोपींना शोधून काढत त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. सचिन नाना शिरसाठ, रा.शिरपूर, सुशिलाबाई पंडीत खुडसाने, रा.नवी भिलाटी (अटक व जामीन मंजूर), आसिफशहा भोलू शहा रा.धुळे (अटक व जामीन मंजूर), शेख शेरू शेख मुसा रा.देवपूर, उत्तम फकीरा पाटील, रा.अजंदे ता.शिरपूर (अटक व जामीन मंजूर), राजेंद्र उत्तम पाटील, रा.अजंदे ता.शिरपूर (अटक व जामीन मंजूर), योगेश नागो राजपूत, रा.अमोदा ता.शिरपूर, रोहीत त्र्यंबक शेटे रा.शिरपूर (अटक व जामीन मंजूर), भरत राजपूत, रा.शिरपूर (अटक व जामीन मंजूर) या फरार आरोपींचा शोध घेण्यात पीएसआय भास्कर शिंदे, हवालदार पंकज चव्हाण, दिनेश परदेशी, रफीक पठाण, कुणाल पानपाटील, कबीर शेख, समीर पाटील यांनी यश आले आहे. डीवायएसपी जाधव यांच्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संदिप पुंडलिक खरात रा.गायकवाड चौक, धुळे, दादू उर्फ रोशन खंडू गुंजाळे रा.शनिनगर,धुळे व मनोज मच्छिंद्र शार्दुल रा.धुळे, गणेश सुभाष कोळी रा.शिरपूर, संतोष गुलाब बेलदार रा.शिरपूर यांना अटक केली आहे. पीएसआय राहुल गावंडे, असई घनश्याम मोरे, पोना.मोहम्मद मोबीन, पोकॉ.सुनील पाथरवट, पोकॉ.निलेश महाजन, पंकज खैरमोडे, किरण साळवे यांनी ही कामगिरी केली. हे दोन्ही विशेष पथकं आणखी अन्य फरार आरोपींचा शोध घेत आहेत.