मुंबई । कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित अशा बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 15 मार्च 2001 म्हणजे 16 वर्षापुर्वी कोलकत्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर व्ही.व्ही.एस.लक्ष्मण व राहुल द्रविड यांनी ऐतिहासिक फलंदाजी करून 376 धावांची भागीदारी करून भारताचा धावा संख्या 657 नेऊन ठेवली. तर हरभजनसिंग याने दोन्ही डावात 13 गडी बाद केले.अशा कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 16 कसोटी अपराजित असलेल्या ऑ÷स्ट्रेलिया संघाला पराभव करून एक ऐतिहासिक कमगिरी करून त्यांचा गर्वहरण केले होते.संपूर्ण इडन गार्डन्स स्टेडियमवर ढोल-ताशे आणि देशभरात जल्लोष करण्यात आला होता. लढाऊ वृत्ती कायम ठेवली की हातातून निसटणारा सामना देखील जिंकता येऊ शकतो, याचे उदाहरण ही कसोटी ठरली. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका
खेळत होता.
16 वर्षांपूर्वी कोलकाताचे इडन गार्डन्स स्टेडियम 15 मार्च 2001 साली भारतीय संघाने कसोटी बहाद्दर ऑस्ट्रेलियाच्या संघावर संघर्षपूर्ण विजय प्राप्त केला होता ऑस् ट्रेलियाला कसोटीत पराभूत करणे हे खूप कठीण असल्याचे त्यावेळी सांगितले जायचे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला या सामन्यात धूळ चारून सलग 16 सामने अपराजित राहण्याच्या कांगारुंच्या पराक्रमाला लगाम घातला.त्याच संघाबरोबर रांची येथे 16 मार्च म्हणजे आजपासून तिसरी कसोटी सुरू होणार आहे.दोनही संघ 1-1 च्या बरोबरीत आहे.त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
ऑस्ट्रेलिया व भारतामध्ये मार्च 2001 मध्ये कसोटी सामना ऐतिहासिक झाला होता. 16 सामने अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्याचे साम÷र्थ्य भारतीय संघाने दाखविले होते.ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात भारतीय संघासमोर 445 धावांचे आव्हान दिले होते.स्टीव वॉने शतकी खेळी साकारली होती. याला प्रत्युत्तरात भारताची दयनियस्थिती झाली होती. 128 धावांमध्ये भारताचे आठ फलंदाज तंबूत दाखल झाले होते. भारताचा पहिला डाव 171 धावांत संपुष्टात आला होता. भारतीय संघावर फॉलोऑनचे संकट ओढावले होते. दुस़र्या डावात भारताकडून व्हीव्हीएस लक्ष्मणने मैदानात तग धरून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 281 धावांनी ऐतिहासिक खेळी साकारली होती.कसोटी व्ही.व्ही.एस.लक्ष्मण याची वैयक्तिक सर्वाधिक मोठी धावसंख्या होती.
गोलंदाजीची अफलातून कामगिरी
दुस़र्या बाजूला भारताची दिवार म्हणून ओखळ असलेल्या राहुल द्रविडने कांगारूंच्या नाकी नऊ आणले. द्रविडने 180 धावा ठोकल्या. द्रविड आणि लक्ष्मण बाद झाल्यानंतर भारतीय संघाने आपला डाव 7 बाद 657 धावांवर घोषित केली होती. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 384 धावांचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने 45 षटकांमध्ये तीन विकेट्सच्या मोबदल्यात 166 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाचवा दिवस संपण्यासाठी केवळ 30 षटकांचा खेळ शिल्लक असल्याने सामना ड्रॉ होणार असे चित्र होते. पण भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सत्रात अफलातून कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांत गुंडाळला. भारतीय संघाने सामना तब्बल 171 धावांनी जिंकला. यानंतर चेन्नई कसोटीत देखील भारताने विजय प्राप्त करून मालिका जिंकली होती.
भारतीय गोलंदाज जहिर खान, प्रसाद,राजू, गांगुली याच्यासह हरभजनसिंग याने 30.3 चेडूत टाकत 8 ओव्हर विनाधावा, 73 धावादेवून 6 गडी बाद केले होते.तर सचिन तेडूलकर याने 11 ओव्हर टाकून 3 गडी बाद केले होते. या कसोटी दोन्ही डावात हरभजनसिंग याने 13 गडी बाद केले होते.तर सचिन तेंडूलकर याने दोन्ही डावात फक्त 20 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा दुसर्या डाव — 1-74,2-106,3-116,4-166,5-166,6-167,7-173,8-174,9-191,10-212