जळगाव : जिल्ह्यात ठिकठिकाणी संगीताच्या सुरेल स्वरांनी सांगलीमध्ये गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी उगवत्या सूर्याच्या साक्षीने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आणि मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपडावा. दरवर्षी या नववर्षाची सुरूवात भल्या पहाटे मधुर स्वरांनी करण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील सर्व सांस्कृतिक संस्थांकडून विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडवादिनी अनेकजण नव्या वस्तू, नवे घर, नवे वाहन, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करतांना दिसून आले. सर्वत्र मंदीचे सावट निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यात फळ व भाजीपाल्यांच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. मात्र गुढीपाडव्याचे स्वागत जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
चोपडा शहरात सामुहिक गुढीचे पुजन
चोपडा । शहरात हिंदू जनजागृती समिती तर्फे छत्रपती शिवाजी चौकात सामुहीक गुढीचे पूजन करण्यात आले. हिंदूधर्मभिमानी कैलास व्यास यांनी स्वपत्नीक गुढीचे पूजन करून शिवाजी चौकात गुढी उभारली.विवेक महाराज यांनी मंत्रोउच्चार करीत गुढीचे पूजन विधी सांगितले. तसेच शहरातील नवग्रह मंदिर परिसरात स्वराज्य निर्माण सेनेचे सुनिल सोनगीरे यांनी गुढीचे पूजन करीत सामुहीक गुढी उभारली.शहरातील गुजरअळी, नागलवाडी चौक या भागात सामुहीक गुढीचे पूजन करण्यात आली. प्रथम हिंदू धर्माचे प्रतीक हिंदू धर्मध्वज व वाहनावर ठेवण्यात आलेल्या प्रभू श्रीराम चंद्राचे पूजन तथा माल्यार्पण करण्यात आले. यानंतर हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातून सकाळी 9 वाजता पद फेरी काढण्यात आली. या पद फेरीत वेले येथील अमर संस्था संचालित बालकाश्रम मधील ह.भ.प प्रविण महाराजांच्या वारकरी शिक्षणमंडळाती बालकांनी टाळ मृदूंगाच्या ठेका घेत नाचत-गात पद फेरीत नववर्षाचे चैतन्य निर्माण झाले. तसेच लहान मुलींनी अस्सल मराठमोळा नव्वारी साज घालत भगवा ध्वज हातात घेत पद फेरीत भगवे आकर्षण निर्माण केले. या नंतर मेन रोड-गोल मंदिर-नागलवाडी चौक-थाळनेर दरवाजा मार्गे गांधी चौकातील श्री राम मंदिरात पद फेरीची सांगता करण्यात आली.पद फेरी वर ठिकठिकानी पुष्प वृष्टी करण्यात आली तसेच ठिकठिकाणी हिंदू धर्माचे प्रतीक हिंदू धर्मध्वजाचे माता-भगिनी पूजन केले.यावेळी हिंदू नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले.
यांचा होता सहभाग: यावेळी चोपडा नगरीच्या नगराध्यक्ष मनिषा जीवन चौधरी,नगरसेवक तथा गटनेते जीवन चौधरी,भाजपा माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, शिवसेनेचे माजी नगरसेवक पप्पू सोनार, युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष सागर ओतारी, प्रवीण जैन, सागर बडगुजर, स्वराज्य निर्माण सेनेचे सुनिल सोनगीरे, अनिल सोनगीरे, राष्ट्रीय स्वयंसंघाचे लक्ष्मण शेट्टी, हिंदू जनजागृती समितीचे यशवंत चौधरी, सुधाकर चौधरी, अनिल पाटील,रामकृष्ण चौधरी, भगतसिंग पाटील, किशोर दुसाणे, भालचंद्र राजपूत, दीपक राजपुत, डिगंबर माळी, आश्रम राजपूत, सोनल पाटील यांचा सहभाग होता.
शिरूड येथे श्री दत्त संस्थानात विविध कार्यक्रम
अमळनेर । तालुक्यातील शिरुड येथील श्री दत्त संस्थानात हिंदू नवर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. हिंदूंनववर्ष हे शिरुड येथील दत्त संस्थानात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. पहाटे 4 वाजेपासून तर रात्री 12 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे गावात दिवसभर धार्मिक वातावरण निर्माण झाले. दरवर्षी पालखी तालुक्यातील फापोरे बु॥ येथील मंदिरात जावून त्या ठिकाणाहून शिरुड येथे येवून गावात मिरवणूक काढली जाते. शके 1441 साली दत्त गुरु हे माहूर हुन निघाल्यानंतर फापोरे येथे विसावा घेण्यासाठी थांबले होते. परंतु त्या गावातील वातावरण त्यांना आवडले नसल्यामुळे ते शिरुड येथे थांबले होते. त्यावेळेस गावाची निर्मिती सुद्धा नव्हती. त्यामुळे ते ज्याठिकाणी विसावा घेण्यासाठी थांबले त्याच ठिकाणी दत्त मंदिराचे बांधकाम करण्यात आले. दत्त गुरु फापोर्याहून ज्या दिवशी शिरुडला आले तो दिवस गुढीपाडवा असल्याने दरवर्षी गुढीपाडव्याला शिरुड संस्थानातून पालखी घेऊन त्यांना घेण्यासाठी जातात व तेथून आल्यावर पालखीची संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात येते अशी आख्यायिका आहे
गुढी न उभारता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे झाले पूजन
चाळीसगाव । तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील गुरूदत्त कॉलनीतील रहिवाश्यांनी 28 मार्च 2017 रोजी गुढीपाडवा निमित्त आपल्या घरांवर गुढी न उभारता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच सर्वांनी उलट्या तांब्या असलेल्या गुढीचा नकार करून आपल्या घरावर भगव्या झेंड्याच्या गुढी (पताका) उभारल्या होत्या गुढी उभारल्या होत्या. त्यांच्या या क्रांतिकारी पाउलाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.
यांची होती उपस्थिती: यावेळी बंजारा यूथ चे अध्यक्ष योगेश्वर राठोड, संभाजी ब्रिगेड चाळीसगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, टाकळी प्र.चा ग्रामपंचायत सदस्य निलेशभाऊ पाटील, गुरूदत्त कॉलनीतील रहिवाशी नरेंद्र जाधव, संतोष पाटील, सुनिल येवल, राज पाटील, सुनिल शिंपी, प्रितम जोगी, राकेश शिंपी, शुभम कुमावत, गणेश जठार, सचिन शिंपी, दिनेश जठार, शाम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पाचोरा येथे उभारलेल्या गुढीच्या केला जागेत बदल
पाचोरा । येथील शहरातील गुडिपाडव्या निमित्त विश्व हिंदू परिषदच्या वतीने छत्रपती शिवाजी चोकतील शिवाजी महाराजच्या पुतड्याच्या अडरग्राऊंडच्या भीतील गुडी उभारण्याचे आली होती या वेळी आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास गुडी उभारत असताना शिवाजी चोकतील रंगरांगोळी काढुंन भगवे झेंडे लावून गुडीची पूजा राजकीय नेत्यांच्या हातून पूजा करण्यात आली. मात्र यावेळी नपाचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष संजय गोहिल, आर.ओ. पाटील, उपनगरअध्यक्ष शरद पाटे याची उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्याचा विसर राजकीय नेत्यांना पडला होता की काय ? असा प्रश्न उपस्थित होत होता. यानंतर हि बाब संभाजी बिर्गेड व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन त्या संघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील नगरपालिका प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासकीय अधिकारी यांना धारेवर धरून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यात शिवाजी चौकातील शिवाजी महाराज याचा पुतळ्यापासून ही गुढी तात्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. संभाजी बिर्गेड व मराठा सेवा संघाच्या दणक्याने उभारण्यात आलेल्या गुडीचे नगरपालिका प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ गुडी हटविण्याचे आदेश दिल्यानंतर गुढी खांद्यावर घेऊन हटविण्यात आली.
आरव्हीआर गृपतर्फे पाडवानिमित्त उपक्रम
जळगाव । आरव्हीआर इंटरनॅशनल इंटरटेंमेंट एरीनातर्फे आज काव्य रत्नावली परिसर ने आकाशवाणी पर्यंतच्या परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा बाजूस टाकाऊ पाण्याच्या बॉटलपासून ठिबक सारखे तयार केलेले यंत्र लावून पाण्याची बचत व जमिनीची धुप रोखण्याचा एक वेगळा प्रयत्न या गृपतर्फे आज गुडी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर करण्यात आला.
यासाठी उपस्थित या उपक्रमाला जळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांनी उपस्थिती देऊन या उपक्रमाचे त्यांनी आपले श्रमदान देऊन उद्घाटन की, विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जातांना शिल्लक असलेले त्यांच्या वॉटर बॉटलमधील पाणी व नागरिकांनी घरातून निघतांना जवळील परिसरात असलेल्या आरव्हीआर ने लावलेल्या या ठिंबक यंत्रणेत पाणी टाकावे. दिवसेंदिवस ग्लोबल वार्मिगचे प्रश्न व तापमान या सारख्या समस्यावर शासन वेळोवेळी कार्य करीत असतील व त्याचप्रमाणे आरव्हीआर ने या कार्याला हाती घेवून हातभार लावत निसर्गाची व माणुसकीचे मदत करता आहेत. म्हणून अभिनंदन केले. तसेच मनपाने या कार्यासाठी पाणी लयभारी, हॉटेल महेंद्रा, फेमस हॉटेल, बावरची हॉटेल यांचे मनापासून प्रदीप भोई यांनी आभार मानले व महापौरांनी केलेल्या आव्हानाला समस्त जळगावकरांनी दाद द्यावी अशी आरव्हीआरतर्फे विनंती केली. रविकुमार परदेशी, प्रदीप भोई, ऋषिकेश सोनवणे, विनय अहीरे, ईश्वर पाटील, भावेश पाटील, पुनम परदेशी, आश्विनी जाधव, सुवर्णा पानपाटील, रुपाली पाटील आदी उपस्थित होते.
मंगळग्रह मंदिरात गुढीपाडव्याला महागुढी, विविध लोकार्पण कार्यक्रम
अमळनेर । या वर्षीचा गुढीपाडवा दीर्घ काळानंतर मंगळवारी येत आहे. या योग लक्षात घेवून मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंगळवारी 29 मार्च रोजी मंगळदेव ग्रह मंदिरात महागुढी उभारली जाणार आहे. तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ आणि लोकार्पण होईल. महागुढीचे पूजन आणि लोकार्पण आदी कार्यक्रम सकाळी 9.30 ला शहर आणि तालुक्यातील सर्व डॉक्टर्सच्या हस्ते होणार आहे.
भाविकांनी या शुभ मुहूर्तावर दर्शन, अभिषेक आणि महागुढीच्या पुजेला पारंपारिक वेशात यावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मंगळग्रह मंदिराच्या मराठी, हिंदी व इंग्रजी लोगो आणि सिम्बॉलचे लोकार्पण. यामुळे यापुढे संपूर्ण जगभरात मंगळग्रह मंदिरची नाव, अक्षर व चित्राने एकच ओळख होणार आहे.
पुरणपोळ्या देण्याचे आवाहन
आळंदी (देवाची) येथील स्वानंद सुकनिवासी जोग महाराज संस्थापिठ वारकरी शिक्षण संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी सध्या सुरू वर्ष आहे. त्या निमित्ताने तेथे वर्षभरापासून अखंड हरिनाम संकीर्तन सुरु आहे. या महोत्सवासाठी तेथे हजारो भाविक गोळा होतील. त्यांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातून भाविकांकडून पुरणपोळ्या गोळा केल्या जात आहेत. अमळनेत तालुक्यातून भाविकांनी शक्य होतील तितक्या पुरणपोळ्या गुढीपाडव्याला दुपारी एक वाजेपर्यंत श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे आणून द्याव्यात, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.