जळगाव । जिल्हा पोलीस दलातर्फे 84 पदासाठी मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची रविवारी सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. यात 1601 उमेदवारांनी परिक्षा दिली तर 235 उमेदवार हे परिक्षेला गैरहजर होते. दरम्यान, पेपरमधील बुध्दीमत्तेच्या प्रश्न सोडवितांना उमेदवारांचा चांगला कस लागला. जिल्हा पोलीस दलातर्फे मैदान चाचणीपात्र उमेदवारांची मेरीटनिहाय यादी लावण्यात आली होती. त्यानुसार मेरीटमध्ये आलेल्या उमेदवारांना रविवारी लेखी परिक्षेसाठी बोलाविण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 8.50 या वेळात परिक्षा पार पडली. यावेळी 1836 पात्र उमेदवारांना लेखी परिक्षेला बोलविण्यात आले होते. त्यापैकी 1601 उमेदवार हजर होते तर 235 गैरहजर होते.