चौदा घंटागाड्याना शहर स्वच्छतेसाठी हिरवी झेंडी

0

स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहू – मुख्याधिकारी

चाळीसगाव – पालिकेने शहर स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकत आज चौदा घंटागाड्यांना आरोग्य विभागाच्या ताफ्यात सामील केले असून त्यांना आमदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा आशालता चव्हाण व विश्वास चव्हाण यांनी आज सकाळी अकरा वाजता पालिका आवारात सपत्नीक हिरवी झेंडी दाखविली आहे. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी या घंटागाड्यांचे महत्व विशद केले .आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले चाळीसगांव नगरपालिकेला राज्यात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे या करिता सर्वांनी प्रयत्न करावेत नागरिकांनीही ओला कचरा व सुका कचरा वेगळा टाकून घंटागाड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. आपले शहर स्वच्छ राहण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जावे असे आवाहन त्यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, मानसिंग राजपुत, अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दिन शेख, आनंद खरात, रवींद्र चौधरी, शेखर देशमुख, माजी नगरसेवक सोमासिंग राजपुत, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया पवार, गणेश महाले, आवडाप्पा गवळी, पप्पू राजपुत, अमोल गायकवाड यांच्यासह आरोग्य निरीक्षक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम पथकाने पथनाट्य सादर केले. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या या सर्व चौदा घंटागाड्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली.

-फोटो आहे