166 गावांचे ‘गणित’ गुरुजींना कठीण!

0

जळगाव । अवघड क्षेत्रात तालुका मुख्यालयापासून दुर, येण्या जाण्यासाठी दळणवळणाचा अभाव, डोंगराळ तसेच दुर्गम गावे, शिक्षकांन काम करण्यास प्रतिकुल परिस्थिती आदी मुद्दाचा समावेश आहे. तर सोपे क्षेत्र म्हणजे सर्व बाबतीत अनुकुल परिस्थिती होय. शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील प्रश्‍न हा मोठा असल्याने अवघड सोपे क्षेत्रानुसार शिक्षकांच्या बदल्या केले जाणार आहे. अवघड तसेच सोप्या क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावांचा अहवाल शिक्षण विभागातर्फे मागविण्यात आला. हा अहवाल प्राप्त झाला असून जिल्ह्यातील 166 गावांचा अवघड क्षेत्रात समावेश आहे. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून हा अहवाल मागविण्यात आला. हा अहवाल जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांना कळविण्यात येणार आहे.

मंत्र्याचा तालुका सर्वाधिक अवघड
राज्याचे जलसंपदा तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे मतदारसंघ असलेले जामनेर तालुक्यातील सर्वाधिक 42 गावांचा अवघड क्षेत्रात समाविष्ठ आहे. मंत्र्याच्याच तालुक्यातील अशी स्थिती असल्याने आश्‍चर्य व्यक्त केला जात आहे. त्याखालोखाल पाचोरा तालुक्याचा समावेश आहे पाचोरा तालुक्यात सर्वाधिक 29 गावांचा समावेश आहे. रावेर गटशिक्षणाधिकारी यांनी अवघड क्षेत्राचा अहवाल पाठविला नाही.

अवघड सोपे क्षेत्र सर्वेक्षण
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली में, जुन महिन्यात करण्यात येत असते. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शिक्षक बदली संदर्भात आढावा घेतला जात असून बदली संदर्भातील चाचपणी सुरु करण्यात आली आहे. शिक्षक संवर्गाची मोठी संख्या असल्याने इतर संवर्गापेक्षा असलेले भिन्न स्वरुप लक्षात घेऊन बदली संदर्भात वेगळा विचार करण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अवघड व सोपे क्षेत्राचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले होते.

जिल्हा शिक्षण विभागाला अधिकार
17 एप्रिल रोजी होणार्‍या गटशिक्षण अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. 27 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन निर्णयाचे यावेळी वाचन करण्यात आले. या शासन निर्णयानुसार शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार हे आता जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. हे अधिकार अगोदर तालुका प्रशासनाकडे होते.

अवघड क्षेत्र
तालुकानिहाय अवघड व सोपे क्षेत्रांचा सर्वेक्षण करण्यात आले. अवघड क्षेत्रात जामनेर 42, अमळनेर 11, भडगाव 8, भुसावळ 7, बोदवड 6, चाळीसगाव 9, चोपडा 8, धरणगाव 2, एरंडोल 7, पाचोरा 29, मुक्ताईनगर 12, यावल 19, पारोळा 4, जळगाव 2 असे तालुकानिहाय गावे अवघड क्षेत्रात आहेत.