श्रीगोंदा- अगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेची भुमिका १९ मार्च रोजी अकोला येथे होणाऱ्या शेतकरी संघटनेच्या बैठकी नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रा. लो. आघाडी व सं. पु. आघाडी हे मुख्य पर्याय आहेत. इतर काही आघाड्या निवडणुक लढवतील परंतू या पैकी एकही आघाडी समाजवादी व्यवस्था सोडुन शेतकर्याच्या हितासाठी खुल्या व्यवस्थेच्या बाजुने निर्णय घेण्याची शक्यता नाही.
हे देखील वाचा
शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतंत्रतावादी विचाराच्या पक्षांचा पर्याय देणे गरजेचे आहे. जे उमेदवार शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी व एकुनच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेने पुरस्कृत केलेला जाहिरनामा स्विकारण्यास तयार असतील त्यांना स्वतंत्र भारत पक्षा तर्फे उमेदवारी देण्याचाही निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
सर्वच प्रस्थापित पक्ष शेती विरोधी धोरणे राबवीत आहेत. शेतकर्यांना कर्जातुन मुक्त करणार असे फक्त निवडणुकीत अश्वासन दिले जाते प्रत्यक्षात फसव्या योजना जाहीर केल्या जातात. शेतकर्यानी आपली नाराजी व्यक्त करण्याची व शेतकर्यांच्या हिताचे उमेदवार लोकसभेत पाठवण्याची ही संधी आहे. ही निवडणुक शेती धोरणाच्या मुद्द्यावर व्हावी यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशिल आहे.सर्व मतदार संघात शेतकर्यांच्या बाजुचे स्तंत्रतावादी उमेदवार उभे रहावेत ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे. अकोला येथिल कुणबी समाज मंगल कार्यालय, गोरक्षण रोड येथे होणार्या बैठकीस शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.