उल्हासनगर । डिस्ट्रीब्युटर ऐजन्सीकडून 17 लाख 59 हजार 782 रूपयाचा माल घेऊन, त्या मालाची रक्कम न देता परस्पर तो माल दुसर्या दुकानदाराला विकू न त्या पैशांचे अपहार करून एजन्सीची फसवणूक केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार शहरातील कॅॅम्प नं. 3 येथिल पवई चौक परिसरातील सुरेश कुकरेजा(48) यांच्या डेटॉल डिस्ट्रीब्युटर एजन्सीतून बाबु(30) या सेल्समनने 17 लाख 59 हजार 782 रूपयाचा माल नेला होता. त्या नेलेल्या मालाची रक्कम बाबु याने सुरेश यांना न देता तो माल परस्पर दुसर्या दुकानदाराला विकुन ती रक्कम स्वता:च्या फाद्याकरीता वापरून बाबुने सुरेश यांची फसवणूक केली. याप्रकरणी सुरेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबु याच्याविरूध्द मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हाजर केले असता 2 दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास पो.उप.नि.गायकर करीत आहेत.