Repeated abuse of young woman in Madhya Pradesh with lure of marriage : Crime against young man चोपडा : मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीवर लग्न करण्याच्या आमिषाने तरुणाने जवळीक वाढवून अनेकदा अत्याचार केल्याची घटना चोपडासह हरीयाणासह आरोपीच्या मध्यप्रदेशातील नातेवाईकांकडे मध्यप्रदेशात घडली. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर तरुणीने चोपडा शहर पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सचिन उर्फ टिंगल्या मेवा (कालिकुंडी, ता.वरला, जि.बडवाणी, जि.मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
भांडणातून तरुणी पडली बाहेर
मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी चोपडा येथे बहिणीकडे 8 जुलै 2022 रोजी राहण्यासाठी आली असता मोठ्या बहिणीशी तिचे तरुणावरुन भांडण झाले व त्यानंतर त्यानंतर अल्पवयीन मुलीने आरोपी सचिन उर्फ टिंगल्या मेवा (कालिकुंडी, जि.बडवाणी (मध्यप्रदेश) याला घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार 29 जुलै 2022 रोजी आरोपी सचिन मेवा हा चोपडा येथे आला. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीला हरीयाणा येथील मित्राकडे चार दिवस घेवून गेल्यानंतर तीन वेळा त्याने तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. तेथून दोघे सेंधवा (मध्यप्रदेश) येथे नातेवाईकांकडे थांबले. तिथेही सचिनने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, पीडीत मुलगी ही वारला (मध्यप्रदेश) येथे आल्यानंतर वारला पोलिस ठाण्यात तिने गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यक्षेत्र चोपडा शहर असल्याने हा गुन्हा चोपडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तपास हवालदार विजय आनंदा निकुंभ करीत आहेत.