17 गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात बाचक्या आझादनगर पोलिसांच्या जाळ्यात

Daring house burglary in Dhule: Adamant accused Bachkaya in police net धुळे : शहरातील अरीहंत भवनासमोरील प्लॅटमध्ये झालेल्या धाडसी घरफोडीप्रकरणी अट्टल आरोपी इम्रान ऊर्फ बाचक्या खालीद शेख (28 अजमेरा नगर, धुळे) यास आझादनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या तब्यातून एक लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी बाचक्याविरोधात धुळ्यासह मालेगाव व अन्य ठिकाणी चोरी-घरफोडीचे तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत.

बंद प्लॅटमध्ये केली घरफोडी
धुळ्यातील अरीहंत मंगल कार्यालयासमोरील शिव महिमा अपार्टमेंटमधील रहिवासी राजेंद्र उत्तमचंद कटारीया हे पत्नीसह उपचारासाठी मुंबईत गेल्याने प्लॅटला कुलूप होते. चोरट्याने ही संधी साधली होती तर 6 रोजी अपार्टमधील रहिवाशांना कटारीया यांचा फ्लॅटचा लाईट सुरू दिसताच त्यांनी पाहणी केली असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी तिजोरीतील 62 हजार 500 रुपयांची घरफोडी केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दिनेश चंपालाल कटारीया (ग.नं.3, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतर आझादनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे बाचक्या शेखच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून 52 हजारांची रोकड तसेच लोखंडी टॉमी तसेच गुन्ह्यात वापरलेली 70 हजारांची दुचाकी (एम.एच.18 बी.एन.4898) असा एकूण एक लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगरचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक निरीक्षक दीपक पावरा, प्रकाश माळी, संदीप कढरे, योगेश शिंदे, शोहेब बेग, आतीक शेख, चालक हरीष गोरे यांच्या पथकाने अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली. तपास पोलिस नाईक संदीप कढरे करीत आहेत.