17 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 111 अर्ज

0

शिरपूर । तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटचया दिवशी सरपंचपदासाठी 111 तर सदस्यपदासाठी 513 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. दरम्यान, सर्वांत जास्त सरपंचपदासाठी 21 अर्ज थाळनेर येथून तर सर्वात कमी 3 अर्ज अर्थे खुर्द व तोंदे या गावातून दाखल करण्यात आले आहेत. गावनिहाय सरपंच व सदस्यपदासाठी एकूण आर्ज पुढीलप्रमाणे खंबाळे 13-31, बोराडी 4-31, अर्थे खुर्द 3-33, करवंद 5-34, वाघाडी 5-33, अजंदे बु. 4-26, वरझडी 5-11, तर्‍हाडकसबे 4-20, अर्थे बु. 5-26, तोंदे 3-30, हाडाखेड 6-15, थाळनेर 21-68, अजनाड 5-34, मांजरोद 8-41, खर्दे पाथर्डे 7-15, हिसाळे 9-48, महादेव दोंदवाडे 4-17 असे अर्ज दाखल झाले आहेत.

वरझडी येथे 11 पैकी 4 जागा म्हणजेच वार्ड 1क, 2अ, 4 अ व ब असे बिनविरोध झाले आहेत. तर वार्ड क्र. 1 अ व 2 क या दोघे जागांसाठी एकही उमेदवार अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरीत 5 जागांसाठी 11 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याठिकाणी सरपंचपदासाठी 5 जणांनी अर्ज भरले आहेत. ग्रामपंचायत निवडणूका या जरी पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी पक्षातील प्रमुखाचां वरदहस्त हा ग्रामीण भागातील जनतेत राहत असल्यामुळे आपोआपच या निवडणूकींना राजकीय स्वरूप प्राप्त होत असते. यामुळे 17 ग्रामपंचायतींमध्ये अनेक गावांमध्ये काँग्रेस विरूध्द काँग्रेस तर काही गावांमध्ये काँग्रेस विरूध्द भाजपा तर काही ठिकाणी काँग्रेस विरोधात काँग्रेस व भाजपा एकत्र अशी लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्यात थाळनेर, बोराडी, करवंद, अर्थे खुर्दे, अर्थे बु. मांजरोद, तोंदे निवडणूक लक्षवेधी ठरणार आहेत.