पाणी प्रश्नावरून विरोधक आक्रमक ; 41 विषयांना मंजुरी
भुसावळ– शहरातील पाणीप्रश्न बिकट झाल्याने त्याबाबत केेलेल्या उपाययोजना सांगाव्यात, टँकर कुठल्या भागात सुरू आहेत त्याबाबत माहिती द्यावी आदी विषयांवरून विरोधकांनी सत्ताधार्यांची कोंडी केल्याने अवघ्या 17 मिनिटात पालिकेची सभा गुंडाळण्यात आली. सत्ताधार्यांनी 41 विषयांना मंजुरी देत सभागृहाबाहेर पाय काढला. या प्रकारानंतर विरोधक अधिक संतप्त झाले व त्यांनी सत्ताधार्यांवर टिकेची झोड उठवली. गुरुवार, 3 मे रोजी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सत्ताधार्यांनी सर्व विषयांवर चर्चेची तयारी दर्शवली असलीतरी विरोधकांनी मात्र आधी पाणी प्रश्नावरच बोलण्याचा आग्रह धरल्याने वाद विकोपाला गेला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना एसीबी प्रकरणात क्लीनचीट मिळाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर उपस्थित होते.