Suicide of a 17-year-old cowherd in Naigaon यावल : तालुक्यातील नायगाव येथील 17 वर्षीय अल्पवयीन गुराख्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच त्यास यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत्त घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राऊजी रायमल बारेला (17, नायगाव, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. राऊजी बारेला हा अल्पवयीन मुलगा गुरे-ढोरे चारून कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावत होता. बुधवारी दुपारी तो घरात एकटा त्याने आत्महत्या केली. मयताची आई घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मयताचा भाऊ प्यारसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.