A minor girl was abducted from Bhusawal भुसावळ : शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा
जामनेर रोडवरील एका भागातल राहणार्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.