मुदत संपल्याने जामनेर तालुक्यातील १७ ग्रामपंचायत प्रशासकांच्या ताब्यात
२४ एप्रिल रोजी मुदत संपूनही निवडणुका न झाल्यानेच ग्रा.पं. प्रशासकांच्या ताब्यात
जामनेर प्रतिनिधी ।
“लुक्यातील १७ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक तामुक्त सोमवारी संपुष्टात आली. यात पहर पेठ, शहापूर, कापुसवाडी, सामोरोद, टाकळी यासारख्या मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मुदत संपली असली तरी निवडणुका न झाल्यामुळे सोमवारपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत संपली आहे त्यामुळे सोमवारपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जामनेर पंचायत समितीतर्फे संबंधित ग्रामपंचायतींना प्रशासक नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. पहर पेठ, शहापूर सामोद, कापूसवाडी या भाजपाच्या ताब्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ग्रामपंचायत मतदारसंघातून काही उमेदवार निवडणूक लढवत
आहेत. त्यांच्यासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान धरले जाणार की नाही? याबाबत काही सदस्य साशंक आहेत. असे असले तरी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यावेळी असलेले ग्रामपंचायत सदस्य मतदार म्हणून पात्र असतील, अशी मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या गावाचा समावेश टाकळी बुद्रुक,
नांद्रा हवेली, सवतखेडा, गोडखेल, गारखेडा, खडकी, तोरणाळा, सामरोद, पहुर पेठ, एकुलती बुद्रुक, नवी दाभाडी, शहापूर, गोरनाळे, दोंदवाडे, पठारतांडा, शिंगायत, कापूसवाडी या गावातील ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. याठिकाणी प्रशासक नियुक्ती झाली •आहे. जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पहुर पेठ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपुष्टात आली असून प्रशासक म्हणून जामनेर पंचायत समिती शाखा अभियंता जी. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असा तिरंगी सामना या निवडणुकीत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यासाठी शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे, गणेश पांढरे, सुकलाल बारी आदी नेते शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी अत्यंत मेहनत घेत आहेत. यावेळेस शिवसेनाच बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे.