नवापुरला उष्माघाताने अनोळखी इसमाचा मुत्यू

0

नवापूरः शहरातील जनता पार्क भागातील गल्ली नंबर 3 मध्ये एका फ्लॅटच्या भिंतीलगत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. काही दिवसांपूर्वी हा इसम या परिसरात फिरत असल्याचे सांगण्यात आले. या इसमाचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. इसम अनोळखी असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अनोळखी इसम अंदाजे 25 ते 40 वयोगटातील असून उंची साडेपाच फूट, सावळा रंग, अंगावर पांढरा शर्ट असे त्याचे वर्णन आहे. त्या अनोळखी इसमाचे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.