18 rioters from three gangs in Shendurni banished for six months शेंदुर्णी : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या शेंदुर्णीतील तीन टोळ्यांमधील 18 उपद्रवींना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.
या संदर्भात पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी आदेश काढले. पहूर पोलिस स्टेशनला आदेश प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.
तीन टोळ्यांवर कारवाईने खळबळ
शेंदुर्णी गावातील तीन टोळ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांचा उपद्रव थांबला नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक इंगळे, गोपनीय शाखेचे गोपाळ माळी व विनय सानप यांनी प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व डीवायएसपी भारत काकडे यांनी पडताळणी करून अहवाल सादर केला होता. पहूर पोलिस स्टेशनला आदेश प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
या संशयीतांवर झाली हद्दपारीची कारवाई
दरम्यान, हद्दपार करण्यात आलेल्या उपद्रवींमध्ये बाशिद खाटीक, वसीम खाटीक, रिहान खाटीक, मुराद शकील खाटीक, हमीद दादामियाँ खाटीक, नईम उर्फ नमा कादर खाटीक, इस्त्रायल कादर खाटीक, अमीन कादर खाटीक, सादीक युसुफ खाटीक, अमोल मोरे ,कृष्णा भावसार, सचिन धनगर, अविनाश प्रकाश धनगर, सागर ज्ञानेश्वर पाटील, सागर सुभाष ढगे, शुभम गुजर, शरद बारी, अफसर खाटीक यांचा समावेश आहे.