शहादा । शहादा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीच्या 20 जागांसाठी शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. उर्वरित 18 जागांसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी पाठ फिरवली आहे. पोटनिवडणूकांसाठी चौथ्यांदा निवडणूक आयोगाने अधिसूचना जाहीर केली आहे.तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरिता निवडणूक विभाग सहा महिन्यात जाहीरनामा प्रसिद्ध करीत असते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. महसूल प्रशासन कामाला लागते परंतु दिवसातून एकही अर्ज दाखल होत नाही.
गुरूवारी चित्र होईल स्पष्ट
जून ते सप्टेंबर 2018 मुदत संपलेल्या तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम तहसीलदार मनोज खैरनार यांनी जाहीर केला आहे. पोटनिवडणूक पाडळदा बु, कमरावद, बिलाडी त.स., बुपकरी, श्रीखेड, भोरखेडा,दामळदा, मलोनी, कुढावद,सावळदा, कुर्हावद त.सा., ओझरटा, परिवर्धा, बुडीगव्हान, अलखेड, काथर्दे दिगर, शिरुड दिगर, व आकसपूर या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आहे.शनिवार दि. 12 मे रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अठरा ग्रामपंचायतींच्या वीस जागांपैकी आकसपूरच्या एका जागेसाठी दोन अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित सतरा ग्रामपंचायतींच्या 19 जागांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. पोटनिवडणुकांसाठी निवडणूक विभागाने या अगोदर चार वेळा निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामस्थांनी पाठ फिरवली आहे. आकसपूरच्या एका जागेसाठी दोन अर्ज आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी बुधवार 16 मे रोजी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.