18 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह

0

जळगाव । जळगाव जिल्हा पोलिस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या 18 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांनी सन्मानचिन्ह जाहिर करण्यात आले आहे. 1 मे रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानचिन्ह देवून अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

विशेष महानिरीक्षकांनी केले अभिनंदन
पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी 2016 मध्ये विविध कार्यालत उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे प्रस्तावर पाठविले होते. त्यावर आज बुधवारी पोलिस महासंचालकांनी शिक्कामोर्तब केला असून 18 अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह देवून 1 मे रोजी आयोजित समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रथमच एकाच वेळी 18 पोलिस अधीकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना अभिनंदन केले आहे.

यांचा होणार सन्मान
1 मे रोजी समारंभात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या पीएसआय ईश्‍वर जगन्नाथ सोनवणे, पीएसआय दिलीप विठोबा पाटील, पीएसआय विजय श्रीकृष्ण बोत्रे, एएसआय रविंद्र बळीराम सपकाळे, एएसआय जयवंत संतोष पाटील, एएसआय अरूण वामनराव पाटील, हेकॉ. दिनशेसिंग लोटू पाटील, हेकॉ. तुकाराम शिवाजी निंबाळकर, हेकॉ. सुनिल शामकांत पाटील, हेकॉ. शेख मकसुद बशीर, हेकॉ. प्रदीप राजाराम चिरमाडे, हेकॉ. राजेंद्र हंसराज पवार, नरेंद्र लोटन वारुळे, प्रदिप वसंतराव पाटील, सुनिल बाबुराव पाटील, जयवंत भानुदास चौधरी, जमील अहमद हमीदखान यांचा सन्मानचिन्हे देवून सन्मानित करण्यात येणार आहे.