18 लाख खर्चूनही आरोग्यसेवा मिळेना

0

यावल। येथील ग्रामिण रूग्णालयाचा वर्षाकाठी तब्बल 18 लाख रूपयाचा खर्च नगर पालिका उचलते, मात्र त्या मोबदल्यात रुग्णालयातुन नागरीकांना आरोग्य सेवा मिळत नाही.कारण गेल्या काही महिन्यांपासुन येथे कायम वैद्यकीय अधिकारी नाही, तेव्हा प्रशासनाने पालिकेच्या सभेत ठाराव करुन येथे कायम स्वरूपी वैद्यकिय अधिकारी द्यावा अशी मागणी केली आहे. तर या ठरावासोबत रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी राज्याचे आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी लेखी निवेदन देवुन वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी मागणी केली आहे.

कायम वैद्यकिय अधिकारी मिळण्याची मागणी
गेल्या काही महिन्यांपासुन यावल ग्रामीण रुग्णालयात कायम वैद्यकिय अधिकारी नाहीये यामुळे येथील रुग्णसेवा कोलमडली आहे तेव्हा या रुग्णालयातील सहा कर्मचार्‍यांचा पगार खर्च वार्षीक तब्बल 18 लाख रुपये पालिका भागवित असुन येथे कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा म्हणुन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय मांडला होता व शासनाकडे वैद्यकिय अधिकारी मागणीचा थेट पालिका सभागृहात ठराव करण्यात आला होता.

प्रधानसचिव डॉ. व्यास यांची भेट
तेव्हा सदरचा ठराव व त्यासोबत या रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीचे अशासकिय सदस्य तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांचे या रुग्णालयात कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा अशा मागणीचे निवेदन थेट राज्याच्या आरोग्य मंत्रालयात सार्वजनिक आरोेग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांची भेट घेवुन त्यांना देण्यात आले व वैद्यकिय अधिकारी नसल्याने काय काय अडचणी येतात या बाबत त्यांना निवेदनाव्दारे अवगत करण्यात आले तेव्हा ही अडचण लवकरचं सोडवण्यात येईल असे आश्वासन डॉ. व्यास यांनी दिले आहे.

अशा येतात अडचणी
वैद्यकिय अधिकारी नसल्याने रस्ता अपघातात किंवा काही दुर्घटनेत मृत व्यक्तीचे शवविच्छेदन देखील वेळीच न होता वादाचे प्रसंग उध्दभवात तेव्हा प्रसंगी काही मोठा वाद वाढला तर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत गावात अशांततेचे वातावरण पसरेल. उपचारात अडचणी निर्माण होवुन रुग्णास थेट जळगाव येथे नेतांना वेळ लागतो परिणामी यात रूग्ण दगावण्याची शक्यता असते. नोकरी करीता तसेच विविध शासकिय भरती करीता दाखले मिळत नाही.

आमदार जावळेंचा एलएक्यु
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे यातचं रावेर आमदार हरिभाऊ जावळे यांनी देखील सदनात यावल ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी मिळत नसल्याचा लेक्ष वेधी प्रश्न मांडला.