18 वर्षानंतर उजवली त्यांची कुस ; नवापूरच्या दाम्पत्याकडे दिवाळी सणात जन्मल्या लक्ष्मी अन् सरस्वती

0

नवापूर- आई होण्याइतका आनंद जगात दुसरा कोणताही नाही मात्र संसारवेलीवर काहींना पूत्रप्राप्तीच्या आनंदापासून अनेकदा वंचितही रहावे लागते मात्र जिथे निराशा आहे तेथेही आशेचा किरणही दिसून येतो. तसाच काहीसा प्रकार नवापूर येथील नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा एस.टी. डेपो नवापूर येथील वरीष्ठ लिपिक ज्ञानेश्वर पवार आणि वंदना पवार या दाम्पत्याच्या बाबतीत घडली. संसारवेलीवर तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जुळे कन्यारत्न प्राप्त झाले. रुचिता व राजवी ह्या लक्ष्मी आणि सरस्वतीचे त्यांच्या घरी ऐन दिवाळीत आगमन झाल्याने कुटुंबाचा उत्साह दुणावला आहे. कुंभार-प्रजापत समाजातर्फे वंदना पवार यांचा पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून संगीता बबनराव जगदाळे व इंजिनियर बबनराव जगदाळे यांनी अभिनंदन करून सत्कार केला. दरम्यान, आपल्याला 18 वर्षानंतर जुळे कन्यारत्न झाले. माझा घरी लक्ष्मी आली. मी आशा सोडलेली नव्हती वा ना उमेदही झालो नव्हतो. कन्या रूपी लक्ष्मीच्या आगमनाने आम्ही आनंदीत झालो आहोत, मुलगा मुलगी असा भेद मी करत नाही, अशी भावना ज्ञानेश्‍वर पवार यांनी व्यक्त केली.