चाळीसगाव । तालुक्यातील खरजई येथील 18 वर्षीय तरूणाने 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खरजई येथील जितेंद्र आनंदा पिलोरे (वय-18) या तरूणाने आपल्या राहत्या घरात 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गळफास घेतली. तरूणाने घेतलेल्या गळफासच कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही. या घटनेबाबत चाळीसगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.