प्रशासनाला उशिराने सुचले शहाणपण
पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत 25 मे रोजी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये सहभागी होणार्या 180 विद्यार्थ्यांना व प्रशिक्षक यांना अल्पोपहार देण्याचा विषय विषयपत्रिकेवर घेण्यात आला. मात्र क्रीडा विभागात आधीचे उरलेले साहित्य वापरात आणल्यामुळे तो विषय फेटाळण्यात यावा असे संबधित विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हा विषय फेटाळला, त्यावर महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.
शिबिर झाल्यावर खर्चाचा विषय
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्यावतीने 25 मे रोजी महापालिकेच्यावतीने दोन उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. या शिबिरामध्ये क्रीडा प्रबोधिनीच्या सहभागी होणार्या 180 विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षकांना माध्यमिक शिक्षण विभागाने अल्पोपहार देण्यासाठी एक लाख 29 हजार रूपयांच्या खर्चास मान्यता द्यावी असा विषय विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता. स्थायीचे सदस्य विलास मडिगिरी यांनी शिबिर झाल्यानंतर तुम्ही खर्चास मान्यता मागता हे चुकीचे आहे.
पुन्हा असे विषय आले नाही पाहिजे, असे सांगत मडिगेरी यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यावर क्रीडा विभागाचे अधिकारी रज्जाक पानसरे यांनी उन्हाळी शिबिराचा दुसर्या विषयात क्रीडा विभागात आधीचे साहित्य उरले ते वापरण्यात आले आहे. त्यामुळे खर्चास मान्यता नाही दिले तरी चालेल हा विषय फेटाळावा असे सांगितले. त्यावरून स्थायीच्या बैठकीत चांगलेच हसू झाले. मात्र शिबिराचा विषय फेटाळण्या ऐवजी अभ्यासाठी आणि विभागाचा मुख्य अधिकारी नसल्यामुळे तहकूब ठेवण्यात आला.