1800 विद्यार्थ्यांची सामुहिक स्वच्छता शपथ

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता संस्कार वाढण्यासाठी स्वच्छ भारत अंतर्गत सामुहिक स्वच्छता शपथ घेण्याचा उपक्रम मराठा मित्र मंडळाच्या काळेवाडीतील माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संवर्धन समितीने आयोजित केला होता. 1800 विद्यार्थ्यांनी सामुहिकपणे स्वच्छता शपथ घेतली. यावेळी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत शाळेत विद्यार्थी पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये निवडक 30 विद्यार्थी, 2 पर्यावरण प्रेमी शिक्षक व मुख्याध्यापक अशा 33 जणांचा समावेश आहे. यावेळी विद्यार्थ्याना पर्यावरण संवर्धनातील आनंद व महत्व पटवून सांगण्यात आला. दैनंदिन व्यवहारात आपण पर्यावरणाचा र्‍हास आपल्या छोट्या छोट्या कृतीतून कशा पद्धतीने थांबवू शकतो, याबाबत सहज गप्पागोष्टींमधून स्पष्ट करण्यात आली.

कष्टकरी पंचायतीला दिले प्लास्टिक
काळेवाडी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या घरातील स्वच्छ व सुके प्लास्टिक शाळेत जमा केले होते. ते सर्व संकलित करून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या संस्थेस सुपूर्द करण्यात आला. असा उपक्रम आता प्रत्येक शाळेत घडवून आणण्यात पर्यावरण समिती पुढाकार घेणार आहे व जमलेले सर्व प्लास्टिक कागद पंचायत ला सुपूर्द करणार आहे.

हे होते उपस्थित
यावेळी पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, कचरा कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत सचिव सोनाली कुंजीर, मुख्याध्यापिका व्ही. एस. काजळे, मुख्याध्यापिका ए. आर. वाल्हेकर, पर्यावरण शिक्षक एल. एस. रासकर, शिक्षिका व्ही. एस. साठे, सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मदन जोशी, सुभाष चव्हाण, विनय मोने, अनिल दिवाकर, विकास आमले व शाळेचे सर्व शिक्षक आणि मनपा आरोग्य विभाग पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रभाकर मेरुकर यांनी केले. आभार दत्तात्रेय कुमठेकर यांनी मानले.