19 केंद्रांवर आज होणार मतदान प्रक्रिया

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकीसाठी रविवारी 17 सप्टेंबर रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 19 केंद्रांवर मतदान होत असून या केंद्रांवर शनिवारी विद्यापीठ अधिकारी/कर्मचारी रवाना झाले.विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 5 हजार 729 मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये अधिसभेच्या निवडणूकीसाठी 2 हजार 560 महाविद्यालयीन शिक्षक, 86 व्यवस्थापन प्रतिनिधी, 88 विद्यापीठ शिक्षक यांचा समावेश असून विद्या परिषदेसाठी 2 हजार 648 व अभ्यास मंडळांसाठी 347 मतदार आहेत.

खान्देशात 19 मतदान केंद्रांसह 33 बुथ
या निवडणूकीसाठी शनिवारी विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. त्यांना कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी निरोप दिला. सहा बसेसद्वारे मतपेटया व मतदानाचे साहित्य घेवून हे कर्मचारी रवाना झाले. उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 5 ही मतदानाची वेळ राहणार असून जळगाव, धुळे व नंदूरबार या तीन जिल्हयात 19 मतदान केंद्रावर 33 बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका बुथवर एक मतदान केंद्राध्यक्षासह 9 कर्मचारी कार्यरत राहतील. एकूण 300 पेक्षा अधिक कर्मचारी या मतदान कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सात विभागीय अधिकाज्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठ परिसरात कर्मचारी भवनात मतमोजणीला प्रारंभ होईल.