19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान ज्ञानप्रकाश यात्रा ; मनशक्ती केंद्रांचा उपक्रम

0

वरणगाव- मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या स्मरण दिनानिमित्त दरवर्षी ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन तालुक्यात 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. भुसावळ तालुक्यातील शाळा महाविद्यालय विविध शासकीय कार्यालय, सोसायटी अथवा कुटुंबांसाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा स्थानिक केंद्रांच्यावतीने भुसावळ तालुक्यात ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानप्रकाश यात्रेत तणावमुक्ती, मत्सरघाताचे दुष्पपरीणाम, परीवाराचे सुख आणि शांती, मनोधैर्यासाठी ध्यान, इच्छापूर्तीसाठी ज्योतीध्यान, मुलांचा सर्वांगीण विकास, अभ्यास यशाच्या युक्त्या, तारुण्यातील महत्त्वकांक्षा, विद्यार्थी समस्या व उपाय यासह इतर विषयांवर एक तासांची कार्यशाळा विनामूल्य घेतली जाणार आहे. या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनात बघण्याचा दृष्टिकोन निर्माण होणार आहे.