पुणे । यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यात 111 टक्के पाऊस झाला आहे. तसेच जिल्ह्यातील 25 पैैकी 19 धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकर्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सर्वाधिक पावसाची टक्केवारी जुन्नर तालुक्यात असून तेथे 144.5 मिमी पाऊस पडला आहे. त्या खालोखाल खेड 141.3 मिमी, भोर 133.6 मिमी, मावळ 133.6 मिमी, मुळशी 124.9 मिमी, आंबेगाव 107.4 मिमी, दौंड 107.2 मिमी, शिरूर 97 मिमी, इंदापूर 94.7 मिमी, बारामती 93.2 मिमी, हवेली 73.7 मिमी, वेल्हा 63.3 मिमी, तर सर्वात कमी पुरंदर तालुक्यात 56.7 मिमी पावसाची टक्केवारी आहे. तर तेरा तालुक्यात 1454.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात 111.9 टक्के सरासरी पाऊस झाला.
हंगामात 125.3 टक्के
जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही मावळ तालुक्यात करण्यात आली असून तेथे 231.3 मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल जुन्नर 160.1 मिमी, खेड 159.4 मिमी, भोर 144 मिमी, मुळशी 130.5 मिमी, दौंड 129.0 मिमी, आंबेगाव 116.7 मिमी, शिरूर 113.4 मिमी, इंदापूर 112.3 मिमी, बारामती 111.3 मिमी, हवेली 84.9 मिमी, पुरंदर 69.2 मिमी, वेल्हा 66.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तेरा तालुक्यात एकूण 1629.2 मिमी पाऊस झाला आहे. या हंगामाची सरासरी 125.3 टक्केवारी आहे.
अद्यापही टँकरने पाणीपुरवठा
पुरंदर आणि बारामती या दोन तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही वणवण फिरावे लागत आहे. सध्या या तीन तालुक्यात अद्यापही 45 टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र गुरुवारी झालेल्या पावसामुळे येथील नागरिक, शेतकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतरही दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत होत्या. मात्र गुरूवारी (दि. 14) या तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या 24 तासांत बारामती येथे सर्वाधिक 50.5, तर दौंडमध्ये 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खेड 39.3, आंबेगाव 2808, तर जुन्नर तालुक्यात 25.6 मिमी पाऊस झाला आहे.
दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊस
यंदा चांगला पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. त्यामुळे चांगले पीक मिळेल या आशेने शेतकर्यांनी रोपे लावली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. दुष्काळी पट्टयात मुसळधार पाऊस झाला. बारामती, दौंड, भोर, वेल्हा, शिरूर, इंदापूर या भागात समाधानाचे वातावरण आहे. गुरुवारी बारामती तालुक्यात 50.5 मिमी, दौंड तालुक्यात 48 मिमी, इंदापूर तालुक्यात 19.5 मिमी, तर पुरंदर तालुक्यामध्ये 7.4 मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती
धरण – प्रकल्पसाठा – टक्केवारी
पानशेत 10.65 100
डिंभे 12.49 100
पवना 8.51 100
कळमोडी – 100
चासकमान – 100
आंध्रा – 100
कासारसाई – 100
मुळशी – 100
नीरा देवघर 11.73 100
भामा आसखेड 7.67 100
वडीवळे – 100
भाटघर 23.50 100
धरण प्रकल्पसाठा टक्केवारी
घोड – 100
वडज – 100
वरसगाव 12.82 100
खडकवासला 1.97 97.3
वीर 9.41 1000
माणिकडोह – 75.66
पिंपळगाव जोगे – 83.51
गुंजवणी 2.16 59.81
उजनी 53.57 109.34
टेमघर 3.71 55.33
येडगाव – 98.47
विसापूर – 56.15