19 लाखांचा अपहार ; किनगाव ग्रामविकास अधिकार्‍यांची चार तास चौकशी

0

अनेक सदस्यांनी गावातून घेतला काढता पाय ; दस्तावेज तपासणीनंतर अनेकांवर कारवाईची शक्यता

यावल- अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयित ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यांची किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात नेवून तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. अपहाराशी संबधीत दस्तऐवज पोलिसांनी तपासले तर पोलिस चौकशी करीता आल्याचे पाहून काही सदस्यांनी गावातुनचं काढता पाय घेतला तर काही सदस्यांनी वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्या कडे धाव घेतली मात्र, 19 लाख 25 हजारांच्या झालेल्या अपहारावेळी उपसरपंच व इतर 15 सदस्यांनी डोळे कसे बंद ठेवले ? विरोधकांचे समजू शकते मात्र सत्ताधार्‍यांनी अर्थपुर्ण रित्या जर या अपहाराला मदत केली असेल तर त्यांना या गुन्हा संशयीत आरोपी म्हणून दस्तऐवज तपासणी अंती अटक होवु शकते असे उपनिरीक्षक अशोक अहिरे यांनी सांगितले.

उपसरपंचांसह सदस्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका संशयास्पद
19 लाख 25 हजारांचा 14 वा वित्त आयोगच्या निधीत अपहार केल्याचा गुन्हा नोंव्हेबर 2017 मध्ये किनगाव बुद्रुक सरपंच ज्येाती महाजन व ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यांच्यावर दाखल झाला होता. तर ज्योती महाजन यांना 13 जून रोजी किनगावातून तर 17 जुन ला ग्रामविकास अधिकारी रोकडे यांना भुसावळातुन अटक करण्यात आली होती सद्या ते पोलिस कोठडीत आहे तर मंगळवारी या गुन्ह्याच्या तपास कामी रोकडे यांना पोलिस किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात घेवुन गेले तेथे अपहार झालेल्या दस्तऐवजांची तपासणी पोलिसांनी केली आहे तर पोलिस ग्रामपंचायतीत येत असल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांनी थेट कार्यालया पासुन लांब रहाणेेचं पसंत केले ग्रामपंचायतीत सुमारे चार तास पोलिस उपनिरीक्षक अशोक आहिरे, हवालदार संजीव चौधरी, विजय चौधरी व ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच टिकाराम चौधरी उपस्थित होते एकुण या अपहार प्रकरणी कागदोपत्र पाहणी अंती अजुन कुणी या अपहारात सामील आहे का ? हे स्पष्ट होईल असे तपासी अधिकारी अशोक आहिरेंनी सांगितले. तसेच सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी 19 लाख 25 हजारांचा अपहार केला तेव्हा ग्रामपंचायतीतील एक उपसरपंच व 15 सदस्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका देखील संशयास्पद आहे. सत्ताधारी व विरोधी असेे फरक असु शकतो मात्र या अपहारात जेे काही संशयीत आढळतील त्यांना अटक केली जाईल असे पोलिस उपनिरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. हा गुन्हा काही सदस्यांना देखील अंगलट येण्याचे संकेत तपासी अधिकार्‍यांनी दिल्यावर किनगाव बुद्रुकचे काही सदस्यांनी थेट वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला.