19 लाखांचे अपहार प्रकरण ; किनगाव सरपंचांना पुन्हा पोलीस कोठडी

0

यावल- तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती महाजन यांना 19 लाख 25 हजार 50 रूपयांच्या अपहार प्रकरणी अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची म्हणजे 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे सरकार वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद करून पोलीस कोठडीची मागणी केली.