लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई !

0

नवी दिल्ली- लोकसभेत वारंवार गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. एआयएडीएमके आणि टीडीपीच्या १९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबीत झालेल्या खासदारांची संख्या आता ४३ झाली आहे.

आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये आंध्रप्रदेशमधील ११ तर एआयएडीएमकेचे ७ खासदार आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार रेणुका बुट्टा यांचा समावेश आहे.