भुसावळ तालुका परीसरात 14 ते 17 फेब्रुवारीदरम्यान पक्षीगणना

0

खिर्डी : भुसावळ तालुका (हतनूर धरण) व परिीरात सध्या देश-विदेशातील पक्ष्यांचा मुक्काम वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील देशी व स्थलांतरीत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोकाग्रस्थ प्रजातींतील पक्षी वैभव यांचा अभ्यास करण्यासाठी 14 ते 17 फेब्रुवारीदरम्यान आढळणार्‍या पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पक्षी निरीक्षण व पक्षी संवर्धनाची चळवळ रुजावी या अनुषंगाने जागतिक स्तरावरील बर्ड काऊंट इंडिया ही संस्था भारतभर पक्षीगणना करीत आहे.या पक्षी गणनेत ज्या ही शाळा/महाविद्यालये, विद्यार्थ्यांना, विविध समुहांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी बर्ड काउंट इंडीयाचे समन्वयक भुसावळ येथील पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे यांच्याशी संपर्क साधावा. त्याबाबतची संपूर्ण माहिती एचटिटिपीएस:// बर्ड काउंट इन/ जीबीबीसी या संकेतस्थळावर ऊपलब्ध आहे. यावरच आपापल्या समुहाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्ष्यांचे अस्तित्वच हे त्या-त्या परीसरातील जैवविविधता आणि निसर्ग समृद्ध असल्याचे द्योतक असते म्हणुनच निसर्ग संवर्धनासाठी पक्ष्यांचा अभ्यास करण्यास पालकांनी आपापल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पक्षी अभ्यासक – लक्ष्मीकांत नेवे (7588740661 / 8149659353) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.