पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार महादेव जानकर यांची यावलच्या बैठकीत ग्वाही
यावल- 1972 च्या दुष्काळापेक्षाही सध्या दुष्काळाची तीव्र स्थिती असून शासनाच्या दूत म्हणून मी तुमच्याकडे पाहणी करायला आलेलो आहे. निश्चितच आपल्या भावना आपले विचार दुष्काळ निवारण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. तालुक्यातील मेगा रिचार्ज झाला तर दुष्काळाला तोंड देता येऊ शकतो त्याच्या मंजुरीसाठी या मिटिंग मध्ये निश्चितच विषय लावून धरतो, असे आश्वासन पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार महादेव जानकर महाराष्ट्र राज्य यांनी यावल पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित दुष्काळजन्य परिस्थिती आढावा बैठकीत दिले. कुठलेही हार-तुरे न स्वीकारता बैठकीस सुरुवात झाली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार हरीभाऊ जावळे, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ खाडिलकर, फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, उपसभापती छोटू आबा पाटील, यावल नगराध्यक्ष सुरेखा कोळी, तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, जि.प.सदस्य सविता भालेराव यांची उपस्थिती होती
पाण्यासह गुरांच्या चार्याची टंचाई भासणार नाही
प्रसंगी मंत्री जानकर यांनी तालुक्यातील यावल, फैजपूर या शहरी भागासह ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून पिण्याच्या पाण्याचा तर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुखाद्याचा, कृषी विभागाकडून खरीप हंगामाचा आढावा घेतला. अधिकारी वर्गाकडून तसेच विधी राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून मिळालेल्या आढाव्यानुसार तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तसेच गुरांच्या चार्याची टंचाई भासू देणार नसल्याचे सांगत वेळप्रसंगी छावण्या उभारल्या जाणार असल्याचे सांगून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.
अधिकार्यांना खडसावले
दुष्काळी स्थिती असल्याने अधिकाजयांनी मुख्यालयातच थांबावे, वीज वितरण कंपनीने बिलाअभावी कोणत्याही शेतकजयाची वीज खंडित करू नये, धिस इज माय ऑर्डर असे सांगून तोडल्यास कारवाईस सामोर जावे अशी समज दिली. पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.बढे यांनी चुकीची माहिती सादर केल्यावरून त्यांना शेतकर्यांना खर्या अर्थाने वाचवणारे पशुसंवर्धन विकास विभाग असताना तुम्हाला तालुक्यातील उपलब्ध चार्याची व लागणार्या चार्याची माहिती देता येत नाही, जी देता ती चुकीची देता, असे सांगत त्यांना चांगलेच खडसावले. बैठकीनंतर जानकर यांनी हिंगोणा, आमोदा, भोरटेक, अकलूद शिवारातील खरीप हंगामाअंर्गत कपाशि, तूर, ज्वारी, केळी यासह विहिरींच्या पातळीची पाहणी केली.