नवी दिल्ली-१९८४ मधील शीख विरोधी दंगलीप्रकरणी काल तब्बल ३४ वर्षानंतर दिल्लीतील एका न्यायालयाने कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या या निर्णयाचे आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
केजरीवाल यांनी कोर्टाने दिलेले निर्णय अगदी योग्य असून शीख बांधवांना न्याय मिळाल्याचे सांगितले आहे.