2 दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सकाळी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दोन्ही दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. परिसरात सध्या शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली. परिसराला जवानांनी वेढा घातला असून संपूर्ण परिसर खाली केला होता.