नवी दिल्ली । मोठ्या प्रमाणात रोखीचा व्यवहार करणार्यांवर प्राप्तिकर विभागाची कडक नजर आहेच. मात्र, आता वित्त विधेयक 2017 मधील तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला असून दोन लाखांपेक्षा अधिक रोख व्यवहार करणार्यांना 100 टक्के दंड करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. रक्कम देणार्या आणि स्वीकारणार्यालाही हा दंड केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे मोठ्या प्रमाणात रोखीचा व्यवहार करत आहेत, त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाची नजर आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात दंड केला जाणार आहे. दंडाची ही रक्कम केलेल्या व्यवहाराएवढीच असणार आहे. काळ्या धनावर निर्बंध आणण्यासाठी सरकारने मंजूर केलेल्या वित्त विधेयक 2017 मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचेही सांगण्यात आले.
नियम उल्लंघन केल्यास दंड
अशाप्रकारे रोख व्यवहार होत असतील तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे त्वरित दिली जावी. यासाठी लश्ररलज्ञोपशूळपषेळपलेाशींरु.र्सेीं.ळप या ई-मेलद्वारे माहिती दिली जावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. वित्त विधेयकातील कलम 269 एसटीनुसार 2 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्याला आणि ती रक्कम स्वीकारणार्यालाही 100 टक्के दंड करण्याची तरतूद या नियमात आहे. त्यामुळे अडीच लाखांचा रोखीचा व्यवहार केल्यास ही रक्कम स्वीकारणार्याला अडीच लाख रुपये दंड होऊ शकतो.