धुळे । दूध डेअरीसाठी 3 एकर जमिन नावावर करण्याच्या रजिस्ट्रेशनसाठी 2 लाख रुपयाची लाच घेतांना साक्री येथील दुय्यम निबंधक परसराम अहिरे व कनिष्ठ लिपिक अशोक सोनकांबळे यांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार दिघावे यांना साक्री शिवारातील दूध डेअरी लगतची 3 एकर जमिन खरेदी करायची होती. यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी साक्री दुय्यम निबंधक परसराम अहिरे यांनी 6 लाख रुपयाची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 लाख देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार दिघावे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय धुळे येथे तक्रार दिली. तक्रारीनंतर कार्यालयातच 2 लाख रुपये स्वीकारतांना दुय्यम निबंधक परसराम अहिरे व कनिष्ठ लिपिक अशोक सोनकांबळे यांच्यासह दिपक ठाकुर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.कारवाई पो.नि.पवन देसले यांच्या पथकाने केली. साक्री पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.