पुणे । घरपट्टीची नोंद करून त्याची पावती देण्यासाठी 2 लाख 80 हजार रूपयांची लाच स्वीकारताना एक सरपंच आणि उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गावच्या सरपंचासह उपसरपंचालाही अटक केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मछिंद्र कराळे (44, सरपंच, ग्रामपंचायत आंबवणे, ता. मुळशी), गणेश गजानन मानकर (39, उपचसरपंच) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे की, आरोपींनी तक्रारदाराकडे घरपट्टीची नोंद करून पावती देण्यासाठी 3 लाखांची मागणी केली होती. शेवटी तडजोड करून 2 लाख 80 हजार रूपयांना काम ठरले. याबाबतची अधिकृत तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर एसीबीने सापळा रचून संबंधित आरोपींना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली.