चेन्नई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या ‘२.०’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये रजनीकांत आणि अक्षय कुमारचा नवा अवतार पाहायला मिनार आहे. प्रेक्षकांची ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
अक्षय कुमार पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांत हे २ सुपरस्टार एकत्र येणार म्हटल्यावर या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या बहुचर्चित चित्रपटाच्या टीझरनेही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची मने जिंकली.