अल्पवयीन मुलीवर २ शिक्षकांचा बलात्कार

0

भंडारा – देशभरात मुलींवरील बलात्काराच्या घटना कमी होतांना दिसत नाही. दरम्यान भंडाऱ्यातील दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून या दोघा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हिवराज कमाने आणि थानसिंग बिसेन असे त्या नराधमांची नावे आहेत.

शिक्षक थानसिंग बिसेन याने २ मे रोजी दुपारी १ वाजता पीडितेला (१७) तिच्या गावाहून लाखनी येथे दुचाकीने मित्राच्या घरी घेऊन आला. त्यानंतर लाखनी आदर्श नगर येथील हिवराज कमाने (४२) या शिक्षकाच्या घरी दोन्ही आरोपी शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केला. एमएससीआयटी या संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आरोपीने पीडितेला आमिष दाखविले होते. भयभीत झाल्यामुळे पीडितेने अत्याचाराबाबत कुठलीही वाच्यता केली नव्हती. शनिवारी हा प्रकार पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यानंतर लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. लाखनी पोलिसांनी पोस्कोसह इतर कलमाखाली दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.