जळगाव – जिल्हयातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 व या अधिनियमातील सुधारित तरतुदींची माहिती व्हावी. याकरीता 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत विश्वस्त दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग.श्री.जोशी, धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांनी दिली आहे. सार्वजनिक संस्था/ट्रस्टचे विश्वस्त/पदाधिकारी यांना बदल अर्ज व ऑडीट रिपोर्ट दाखल करण्याबाबतची माहिती व्हावी. त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणीविषयी मार्गदर्शन मिळावे. याकरिता जिल्ह्यातील न्यासाचे विश्वस्तांनी 20 ऑक्टोंबर, 2018 रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गणेश कॉलनी रोड, जळगाव येथे उपस्थित राहावे. असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.