श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनतर भारतीय संरक्षण दल राज्यात सक्रिय झाले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये, विशेषत: शोपियां-पुलवामामधील 20 पेक्षा जास्त गावांमध्ये सशस्त्र दलांनी अतिरेक्यांची शोधमोहिम हाती घेतली आहे. या गावांमध्ये अतिरेकी लपले असल्याचा संशय आहे. या शोधमोहिमेत सुमारे 3-4 हजार जवान सहभागी झाले आहेत. बुधवारी रात्री उशिराने सुरू झालेल्या या शोधमोहिमेदरम्यान काही ठिकाणी भारतीय जवानांवर दगडफेकही करण्यात आली. 1 मे रोजी पाकिस्तानने पुंछ भागातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत काही अतिरेक्यांच्या मदतीने पाक लष्कराने नियंत्रण रेषा पार करत दोघा शहिदांच्या देहाची विटबंना करताना त्याचे शिर धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर सोमवारी काही अतिरेक्यांना एका बँकेच्या कॅशव्हॅनवर केलेल्या हल्ल्यात 5 पोलीस मारले गेले होते. या हल्ल्यासंबंधित बँकेचे दोन अधिकारी ठार झाले होते. या शोधमोहिमेत हेलीकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने टेहळणी केली जात आहे. भारतीय लष्कराच्या जोडीने केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ) आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलातील जवान सहभागी झाले आहेत.
मोदीजी वचन पाळा
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वत: फौजी असल्याचे सांगत, पाकिस्तानने आपल्या एक जवानाचे डोके कलम केले, तर त्यांच्या तीन जवानांची डोकी कलम करायला पाहिजेत, असे म्हटले आहे. याशिवाय या नुद्दावर भारताने स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवण्याची वेळ आली असल्याचे अमरिंदर सिंग म्हणाले.
करून दाखवणार
भारतीय जवानांची कू्रर विटंबना केलुमुळे देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले की, पाकिस्तानला त्यांच्या कृत्याचे जशास तसे उत्तर देण्यात येईल. सेना भविष्यात काय करणार हे सांगणार नाही, पण करून दाखवल्यावर त्याची माहिती देऊ . भारतीय संरक्शण दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये सुरू केलेल्या शोधमोहिमेत बँक लुटारू आणि पोलिसांकडून बंदुका लुटणार्यांची धरपकड केली जाईल, असे ही रावत यांनी स्पष्ट केले.
शोधमोहिमेची सहा कारणे
दक्षिण काश्मीरमधील अतिरेक्यांशी संबंधित असलेले सुमारे 30-35 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातील एक व्हिडिओ अतिरेक्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाचा होता. या व्हिडिओमध्ये एकुण 16 अतिरेकी दिसतात. यातील 15 अतिरेकी प्रशिक्षण घेत असून एक अतिरेकी रायफल चालवण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे पहायला मिळते. हे अतिरेकी हिजबूल मुजाहदीन आणि लश्कर ए तोयबाचे असल्याचे बोलले जाते. या व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याची सूचना संरक्षण दलाला देण्यात आली होती. मागील काही दिवसांमध्ये काश्मीरमधील सुमारे 100 युवक वेगवेगळ्या अतिरेकी गटात सहभागी झाले असल्याचे वृत्त आहे.
या तिरेक्यांना दक्षिण काश्मीरमधील गावांतून साथ मिळतेय. त्यामुळे या भागात असणार्या घराघरांतून, बगिच्याची तपासणी केली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांकडून शस्त्र हिसकावून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी कुठलाही प्रतिकार न करता अतिरेक्यांना हत्यारे दिलीत. याशिवाय बँकलुटीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी नकारात्मक भूमिका घेतल्याचे उघड झाले आहे. या शोधमोहिमेच्या माध्यमातून या भागातील लोकांशी संपर्क वाढवला जाईल. सीमारेषा ओलांडुन सुमारे 100-150 अतिरेकी भारता घुसले असले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बनावट नंबरची स्कॉर्पियो
भारत पाक सीमेपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कौलिया गावातून पोलिसांनी एक स्कॉर्पियो गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीतून आलेले पाच सहा जण मात्र सभोवतालच्या जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी ताब्यात घेतलेली ही गाडी जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बंदुकीचा धाक दाखवून पळवण्यात आली होती. गाडीवर गुरुदासपूर जिल्हातील नंबरप्लेट लावण्यात आली होती. खरी नंबरप्लेट पोलिसांना तपासणीदरम्यान गाडीत सापडली. गुरुदासपूर येथील बहारामपुर पोलिस स्टेशनच्या तपासणी नाक्याला तोडून ही स्कॉर्पियो पठाणकोटमध्ये आली होती. बहरामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेट जॅमलसिंग पोलिस स्थानकातील अधिकार्यांनी ही गाडी ताब्यात घेतली.