पिंपळनेर : पिंपळनेर पोलिसांनी गुटख्याची तस्करी रोखत दोघांच्या मुसक्या आवळल्या असून पोलिसांना पाहताच तिघे संशयीत पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दोन वाहनांसह सुमारे 40 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
दोन वाहनांतील दोघे जाळ्यात, चौघे पसार
पिंपळनेर पोलिसांनी पिकअप (एम.एच.46 बी.बी.0173) व इनोव्हा (एम.एच.06 बी.ई.7695) जप्त केली असून 18 लाखांच्या वाहनासह 19 लाख 40 हजार 700 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. पिकअप चालक नसीर खान हयात खान (42, रा.मिल्लत नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यास तसेच इनोव्हातील प्रियकिर्ती राजू पगारे (गायकवाड चौक, धुळे) यांना अटक करण्यात आली तर जुबेर अन्सारी, वसीम अन्सारी, सोनू विधाते (नटराज टॉकीजवळ, धुळे) हे पसार झाले आहेत. दरम्यान, वाहनातील विमल सुगंधीत पान मसाला धुळ्यातील नाना विठ्ठल साबळे व अमोल मोरे या दोघांच्या सांगण्यावरुन तसेच जुबेर अन्सारी, वसीम अन्सारी, सोनु विधाते तिघे (रा.नटराज टॉकीज जवळ, धुळे), सचिन मुर्दाडकर (रा.पाचवी गल्ली, प्रियकिर्ती पगारे रा.गायकवाड चौक) यांच्यासोबत गुजरात राज्यातून विकत घेवून धुळ्याला जात असल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, एलसीबी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, भाईदास मालचे, एएसआय प्रवीण अमृतकर, पोलिस नाईक विशाल मोहणे, चेतन सोनवणे, सोमनाथ पाटील, मकरंद पाटील, रवींद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.