यावल : शहरातील 20 वर्षीय युवकाने आत्हत्या केल्याने देशमुखवाडा भागात हळहळ व्यक्त करण्यात आली. धनंजय भिकन कोंडे (20) असे मयत युवकाचे नाव असून रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. युवकाने आत्महत्या का केली ? याबाबत ठोस कारण कळू शकले नाही.
घरी कुणी नसताना केली आत्महत्या
शहरात देखमुखवाडा भागात किराणा व्यावसायीक भिकन कोंडे वास्तव्यास आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा धनंजय कोंडे हा रविवारी दुपारी घरी एकटाच होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास भिकन कोंडे हे घरी आल्यानंतर त्यांनी धनंजय यास आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ते वरच्या मजल्यावर गेले असता धनंजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. यावल पोलिसात राजेंद्र कुंभारकर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत धनंजय कोंडे या युवकावर मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत युवकाच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी, आजी असा परीवार आहे.